SUCCESS STORIES OF DIABETES REVERSAL

By

Participants of Diabetes Free Forever, Pune

My Success Story

Posted by
Smt.Anuradha Morvekar

on 7.1.2025

Photo of Anuradha Morwekar

Medical History:

Description Indicator
Fibroid Uterus -
Blood Sugar Level-pp 400
HbA1c 8.7
Period of diabetes 36 years
Other ailments TB,Obesity,Arthritis

Surgery :

Description Year
Uterus 1988
Breast Cancer 2021

Joining DFF :

Date of Joining DFF : February 2024

Attending Residential Camp : December 2024

Progress after Joining DFF :

Description Result
Weight loss 14 kgs
Current Medicines for sugar tab. 0 - 1/2 - 1/2
HbA1c 7.5
BSL - f 106
BSL - pp 140

माझं नांव अनुराधा मोर्वेकर- वय वर्षे 70. मला 36 वर्षा पूर्वी म्हणजे 1988 मधे मधुमेह detect झाला. त्यावेळी fibroid uteras मुळे मला त्रास होत होता म्हणून रक्त तपासणी केली तेव्हा कळले. त्या वेळी uteras काढावे लागले. तेव्हा पासून मधुमेहाशी लढाई चालू झाली.

13 वर्षांनी म्हणजे 2001 साली मला क्षयरोग झाला. जगते कि मरते अशी अवस्था झाली. शुगर तर 400 पर्यंत गेली होती. मग इन्शुलीन चालू झाले.

क्षयरोगाच्या ट्रीटमेन्ट मुळे सांधेदुखी चालू झाली. क्षयरोगामुळे कमी झालेले वजन वाढत वाढत 70च्याही वर गेले. शुगर तर कमी होण्याचे नावच नव्हते.

2021 मार्च मधे करोना काळात माझे ब्रेस्ट कॅन्सर चे ऑपरेशन झाले त्यातूनही मी सहीसलामत बाहेर पडले 👍🙂

2022 साली मी एका सिनियर व अनुभवी डॉक्टर कडे गेले.त्यांच्या ट्रीटमेन्ट मुळे दोन टाईम इन्शुलीन घेत होते ते एक वेळवर आले.

अशातच जानेवारी 2024 मधे भाग्येश सरांचा विडिओ पहाण्यात आला, like दिल्यानंतर मला वेबीनार अटेंड करण्यासाठी लींक पाठवण्यात आली मी गावी गेले होते म्हणून अटेंड करु शकले नाही. मग परत फेब्रुवारीत दुसरी लींक पाठवली. सरांचे बोलणे ऐकून मी खूप इंप्रेस झाले व लगेच एक वर्षासाठी पैसे भरले. त्यानंतर मी मागे वळून बघीतलेच नाही. जमेल तसे प्रोटोकॉल पाळायचा प्रयत्न केला. घरून अजीबात सपोर्ट नव्हता. पण मी हार मानली नाही. एक गोष्ट केली ती म्हणजे सरांनी ज्या गोष्टी खाण्यातून वगळल्या त्याकडे ढुंकूनही बघीतले नाही.

22 वर्षांपासून घेत असलेले इन्शुलीन एप्रिल महिन्यात म्हणजे 2महिन्यातच बंद झाले. आणखी हुरुप आला. हळू हळू वजन कमी होवून डिसेंबर पर्यंत 14 किलो वजन कमी झाले .

घरच्या प्रॉब्लेम मधून बाहेर पडून मी डिसेंबर 2024 Residential retreat camp attend केला . बर्‍याच गोष्टी नव्याने कळल्या. दोन गोळ्या चालू होत्या त्यातील एक गोळी ऑक्टोबर मधे बंद झाली. सध्या एक गोळी चालू आहे,सकाळी 1 व रात्री 1 घेत होते. आता सरांनी रात्रीची 1/2 केली .ती पण बंद व्हावी यासाठी माझा प्रयत्न असेल.

माझ्या जीवनात हा चमत्कार घडवण्याचे पूर्ण श्रेय मी भाग्येश सर व Dff च्या संपूर्ण टीमला देते. सरांना त्यांच्या कार्यात भरपूर यश मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. 🙏

Rose