By
How to sustain Diabetes Reversal
Posted by
Smt.Medha Sohoni
June 2022 batch
नमस्कार सगळ्यांना आणि विषेश आभार डाॅ भाग्येश कुळकर्णी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे. ५ ऑगस्ट २०२२ पासून मी ह्या प्रोटोकॉल चे पालन करायला सुरुवात केली.तेंव्हाच मी ठरवलं होतं की सर जे जे सांगतील ते पूर्णपणे अंमलात आणायचं.आणि सुरु झाला माझा मधुमेहमुक्तीचा प्रवास. दिवसाची सुरुवात ईश्वराचेआभार मानण्यापासून होते.योगासन वर्गात ईश्वर प्रणीधान असतं त्यामुळे मन शांत राहतं.नियमीत योगासने एक तास,पायी चालणे एक तास.
घरी आल्यावर आपल्याला सांगीतलेल्या रोज वेगवेगळ्या स्मूदी घेते.मग दहा वाजता सॅलड साधारण एक मोठी वाटी भरुन असतं त्यात सफरचंद,पेरु गाजर,काकडी,रंगीत सिमला मिरच्या,कणीसाचे दाणे,मोड आलेले मूग इ.घरांत उपलब्ध असलेल्या भाज्या आणि फळं असतात. जेवणाची वेळ बारा वाजता असते.जेवणात दिड भाकरी किंवा खपली गव्हाची पोळी छोट्या आकाराची असते पोळीच्या दुप्पट भाजी,उसळ वरण इ. चार समावेश असतो.
दुपारी मी अगदी थोडावेळ आराम करुन माझं आवडीचं काम शिवण आणि काम्पुटराईज्ड एम्ब्राॅयडरी करणे जो माझा छोटासा व्यवसाय आहे ते करते.सोबत विविध भारती असतं.
रात्रीचं जेवण अगदी हलकं असतं.रात्रीच्या जेवणात कधी मुगतांदुळाची पातळ खिचडी,मोड आलेल्या मुगाचा डोसा,मिलेटचा उपमा भरपूर भाज्या घातलेला कधी ज्वारीची आंबील इ . वेगवेगळे पदार्थ असतात सोबत कधी सोलकढी कधी मिक्स व्हेज सूप,टमाटर सूप इ.असतं ह्या सगळ्यांत कार्ब पोटात कमी जातील हेच उद्दिष्ट असतं.असं हलकं खाल्याने पोटही थॅक्यू म्हणतं आणि झोपही चांगली लागते.
आता ह्या नियमांचं पालन करतांना अनेकदा बाहेर जावं लागतं लग्न,भिशी तेव्हा आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवण्याचं मोठंच काम असतं कारण मी असं असं करतेय असं सांगण्याचाच अवकाश की लोकं आपल्या पाठीमागे लागतात अगं काही नाही होत एकदाच खा आणि असे प्रसंग वारंवार येतच असतात.असे प्रसंग आले की प्रत्येक ठिकाणी घरून जेवून जायचे,कुठे जेवणं शक्य नसेल तर आपली भरपूर कोशिंबीर घेऊन जायचे.मैत्रिणी हसायच्या पण त्याकडे दुर्लक्ष करायचं.
मी एक खूणगाठ ठरवली होती की जे आपण सुरु केलंय ते प्रामाणिकपणे करायचं स्वतःच्या मनाला न फसवता.ह्यामुळे ठरलेल्या वेळात माझा मधुमेहमुक्तीचा प्रवास पूर्ण झाला.
आता मी फ्रीडम स्टेजला आहे आणि आता तर मनावर संयम असणे आवश्यक आहे.मी मनाला सांगितलंय की इतके दिवस खाल्लंय ना मनासारखं मग आता शरीराचं ऐकायचं मनावर नियंत्रण ठेवायचं आणि ते सहज साध्य आहे.
एकदा कां मनाशी ठरवलं की सगळं काही शक्य आहे.ह्या यशात माझ्या यजमानांची वाटा आहे कारण माझ्यासाठी जे जेवण करते तेच तेही खातात ईश्वराच्या कृपेने त्यांना कुठलाही त्रास नाही.
पुन्हा एकदा डाॅक्टर भाग्येश कुळकर्णी आणि टीमचे आभार.आपण खरंच भाग्यवान आहोत आपल्याला चांगला मार्गदर्शक लाभला आहे. धन्यवाद 🙏🙏🙏
From: FOREVER ABUDANCE 1 BATCH:
Congratulations Smt.Medha Sohoni for sustaining the Diabetes Reversal by achieving a HBA1c of 4.9 even after 1 year 3 months.