SUCCESS STORIES OF DIABETES REVERSAL

By

Participants of Diabetes Free Forever, Pune

My Success Story

Posted by
Shri Anand Kalyankar

on 9.4.2025

Photo of Shri Anand Kalyankar

मित्रानो, माझे नाव आनंद ग्यानोबाराव कल्याणकर, राहणार, तरोडा बुद्रुक, ता. जिल्हा नांदेड, व्यवसाय पत्रकारिता आणि शेती, वय 31 वर्षे...! टिसीवर असलेल्या नोंदीनुसार 62 वर्षे...!

मी 21 मार्च 2000 साली सहज रक्त तपासणी केली. या तपासणीतून मला डायबिटीस असल्याचे निदान झाले. उपाशीपोटी 123 तर जेवनानंतर 228 माझ्या रक्तात अतिरिक्त साखर आढळून आली. डॉक्टरांनी सांगीतल्या प्रमाणे मी नियमित औषध गोळ्या घेणे सुरू केले. पुढे आठ नऊ वर्षांनंतर एकएक करत मला अनेक आजारांनी एकदाच गाठले.

सुरूवातीला मला सर्व्हायकल स्पाॅडीलेसिसचा त्रास सुरू झाला. माझ्या वेगवेगळ्या तीन मनक्यातली गादी सरकली होती, याच काळात फोर्जन शोल्डर उद्भवला, यात दोन्ही खांदे जाम झाले. हातांची हालचाल बंद झाली. मला शर्टही घालता येत नव्हते. हे कमी म्हणून की काय सायटीकाचाही त्रास सुरू झाला. मला चालता फीरता येणे तर सोडा...! अंथरूनातून उठून संडास बाथरूमलाही जाता येणे बंद झाले. यासाठी दोन माणसाची मदत घ्यावी लागत होती.

मित्रहो, मी 40 हजार लोकसंख्या असलेल्या गावचा सरपंच होतो. गावात माझे समर्थक जसे होते. तसे राजकीय विरोधकही होते. ते माझ्या भविष्याविषयी झालं. संपला. चार आठ दिवसाचा सोबती असे म्हणून बोलू लागले. ईतकी माझी तब्बेत खराब झाली होती. या स्थितीतून बाहेर येण्यासाठी मी धडपड होतो. अनेक प्रयत्न करत होते. उपचाराच्या आसेने हैद्राबाद, बेंगलूरू, औरंगाबाद, लातूर, परभणी या मोठ्या शहरांसह जिल्ह्यातील अनेक खेडेगावातील वैद्याकडे जाऊन आलो. या वेगवेगळ्या उपचारातून, मी थोडासा सावरलो. मला काठीच्या सहाय्याने चलता फिरता येऊ लागले. दुचाकीवर चालकाच्या पाठीमागे (स्त्रीयांसारख) एका दिसेने तोंड करून बसू लागलो. तर पायी चालतांना माझे पाय जमीनीपासून दोन तीन सेंटिमीटरही उचलेनासे झाले होते. त्यामुळे पायाखाली उंच माती, दगड आला तर त्यास पाय अडकत होते. चालतांना पाय अडकल्यामुळे समोर झोक जाऊन मी बऱ्याच वेळा तोंडावर पडलो होतो. या काळात माझा डायबिटीस uncontrol झाला होता. जेवना अगोदर 225 आणि जेवनानंतर रक्तातील साखर 350 पेक्षा आधिक राहत असे HBA1C लेवल 10.5 होती. माझे वजन 76 किलो झाले होते. अनेक आजारांनी मला जर्जर करून सोडले होते. तळपायापासून डोक्यावरच्या केसांपर्यंत शरीराच्या प्रत्येक भागात वेदना होत होत्या, तेंव्हा यातून कस बाहेर पडायच हेच मला सुचत नव्हत.

एका दिवशी माझे जूने मित्र प्रा. कृष्णराव भिसे हे माझ्याकडे सहज भेटायला आले. त्यांनी मला पूण्याचे डॉक्टर भागेश कुलकर्णी यांच्या डीएफएफ या संस्थेमार्फत डायबिटीसवर चांगले उपचार केले जातात. मला स्वतः चांगला अनुभव आला आहे. विना औषध गोळी माझा डायबिटीस मेंटन झाला आहे. असे भिसे यांनी सांगितले. आनंदराव तुम्हीही डीएफएफ जाॅईन करा असे त्यांनी सुचवले. डॉ भाग्येश कुलकर्णी यांच्या वेबीणारची लिंक मला पाठवली. हा वेबिणार ऐकुण मी प्रभावीत झालो. डीएफएफच्या एप्रिल 2022 च्या बॅचला जाॅईन झालो.

5 एप्रिल 2022 या दिवशी सायंकाळी 7 ते रात्री 9.30 असा आडीच तास डॉ. भागेश कुलकर्णी यांचा वेबीणार झाला. तो मी काळजीपुर्ण गंभीर लक्ष देऊन ऐकला. तेव्हाच मी 'एस आय कॅन चेंज' चा निर्णय घेतला. माझा निर्णय म्हणजे निर्णयच असतो. मी एकदा निर्णय घेतला की निर्णयापासून डळमळत नाही. तो बदलतही नाही. माघार, तडजोड, तह हे शब्द माझ्या डिक्सनरीमध्ये नाहीतच...!

डाॅक्टर कुलकर्णी सरांचा वेबीणार ऐकन्यापुर्वी सायंकाळी पाच वाजता मी घरच्या म्हैशीच्या घटदुधाचा विना साखरेचा चहा घेतला होता. तोच दुधाचा आजपर्यंतचा शेवटचा चहा ठरला आहे...!

वेबीणार मधून डॉ कुलकर्णी सर डायबिटीसवर नियंत्रण मिळविण्यासाठी MRPS म्हणजे नेमक काय? ते कसे सेवनात टाळायणचे? नैसर्गिक अन्न किती महत्वाचे आहे. हे जस जस समजाऊन सांगत होते. तस माझ मन त्यांना फालो करायला तयार होत गेले.

विना औषध बिना गोळी डायबिटीसवर सहज मात करता येते अस वेबीणार मधून डॉ. कुलकर्णी सर विश्वासाने ठासून सांगत होते. त्यासाठी मी सांगतोय तशी तुमची जीवनशैली बदलण्याची तयारी असली पाहिजे असे वेळोवेळी पटऊन देत होते. तेंव्हा मी मनातल्या मनात एस आय कॅन चेंज म्हणत होतो.

दिवसभरात सात आठ अॅलोपॅथी गोळ्या /रात्री इंसुलीन ची सूई घेऊन मला उपयोग होत नसल्यामुळे माझे मन बरेच खचलं होतं. मला कोणत्याही परस्थीतीत दुरूस्त व्हायचे हे मी मनोमन ठरवलं होतं. डॉ. कुलकर्णी यांचा वेबीणार सुरू असतांनाच मी मनातल्या मनात संकल्प केला. एस आय कॅन...!

आज आतापासून दुध आणि दुधाचे पदार्थ बंद करायचे, मांसाहार करायचा नाही. मी अगोदर पासूनच मांसाहाराच्या प्रेमात कधी पडलो नव्हतो. कोणतेही रिफाईन केलेले पदार्थ सेवन करायचे नाही. कसाही प्रसंग येओ पाॅकेट बंद अन्न खायचे नाही. साखर आणि प्रक्रिया केलेले नमक खायचे नाही. या सर्वाना जे पर्याय आहेत. ते सर्व पर्याय मी स्विकारले. या घटणेला 5 एप्रिल 2025 रोजी तीन वर्षे पुर्ण झाली.

तीन वर्षात मी डायबिटीस बरोबरच सर्व आजारातून मुक्त झालो आहे. या काळात मी 13 - 14 किलो वजन कमी केले आहे. पुर्वी माझे वजन 76 किलो होते. आता 62 ते 63 किलो मेंटन करून आहे. माझे HBA1C चा रिपोर्ट 10.5 होता. आता हाच रिपोर्ट 6.4 असा आहे.

अंथूरनातून उठता बसता येत नव्हते. तो "आनंद कल्याणकर" डीएफएफ जाॅईन केल्यानंतर दोन महिन्यात बारा बारा किलोमीटर माॅर्निग वाक करू लागला.

'राखेतून फिनिक्स पक्षाने उंच आकाशात भरारी घ्यावी तशी' मी आकाशात उंच भरारी घेतली आहे. डीएफएफ जाॅईन केल्यानंतर येणारा पहिला वर्दापण दिन मी हिमालयाच्या उंच उंच पर्वत रांगा चढून साजरा केला. जोगीणी फाॅल, पांडूरोपा, हमटापास, तोष व्हीलेज असे एकुण पाच ट्रेक हिमालयात पुर्ण केले.

पूणे जिल्ह्यातील सिंहगड, राजगड तसेच भूतान देशातला टायगर नेक्स्ट ट्रेक पुर्ण केला. नांदेड शहराजवळ गुंडेगाव आणि रत्नेश्वरी डोंगर अनुक्रमे 7 आणि 6 वेळा वेगवेगळ्या बाजूनी ट्रेक केले. चंद्रा नदीत राफटींग, सोलांग व्हॅलीत रोपवे प्रवास असे मृत्यूला भेडविणारे खतरनाक स्टंट केले.

माझ्या या टोटल ट्रान्सफार्मसाठी मला मार्गदर्शन करणारे गुरू डॉ. भागेश कुलकर्णी आणि त्यांच्या डीएफएफच्या संपूर्ण टीमला मी विसरू शकत नाही. त्याचे शतशः आभार...! या शिवाय रेसिडेंशिअल कॅम्प जुलै 2022 बॅचचा एक एक सदस्य मला दररोज ऊर्जा देतो. हे विसरू शकत नाही. ते सर्व सदस्य म्हणजे आमचं एक छोटसं कुटुंबच आहे. मी माझ्याच कुटूंबाचे आभार मानने त्यांना आवडणारे नाही. मला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे खास खास आभार मानायचे आहेत. माझी मुलगी, माझा मुलगा आणि माझी पत्नी यांचा माझ्या प्रत्येक कृतीला सपोर्ट असतो. त्यांचे आभार मानतो. याही पेक्षा भविष्यात माझे जीवन जगणे आधिक समृध्द, सुंदर बनविण्यात तुमचे सर्वाचे योगदान गृहीत धरतो. धन्यवाद...!

आपला विश्वास
आनंद कल्याणकर नांदेड
दिनांक 9/4/2025

Rose