SUCCESS STORIES OF DIABETES REVERSAL

By

Participants of Diabetes Free Forever, Pune

My Success Story

Posted by
Shri Vijay Wakekar

on 30-5-2023

Photo of Vijay Vakekar

माझे नाव विजय वाकेकर,वय वर्षे ६२. २० वर्षांपासून Thyroid त्यानंतर diabetes, cholesterol ,BP यांनी शरीरात घर केलं. दररोज औषध वेळीच घेऊन राहणं हा नित्यनियम.

मे २२ पासुन DFF डॉ.भाग्येश कुळकर्णी सरांचे मार्गदर्शनाने बिना औषधी मधुमेह मुक्ती करीता online protocol सुरू केले तेंव्हा माझे वजन ९७ किलो,डायबिटीज करीता 500 mg च्या दोन गोळ्या, Cholesterol 10mg एक गोळी,बी.पी. ५ एमजी एक गोळी, Thyroid -62.5mg दररोज असे चालु होते.

३० सप्टेंबर २२ पासून शुगर ची गोळी व जानेवारी २३ पासून cholesterol ची गोळी बंद आहे.तसेच Thyroid tablet २ दिवस बंद केले आहे व बी.पी करीता २.५ एमजी एकदिवसाआड एक गोळी सुरू आहे.

वजन २० किलोने कमी झाले. फेब्रुवारी पासून ७७ किलो आहे.औषधेही कमी होत आहे परंतु वजन अधिक कमी व्हायला हवं म्हणून देहम येथे Diabetic Free Forever आयोजित पाच दिवसीय रेसिडेन्सीयल कॅम्प मधे भाग घेतला. येथे डॉ भाग्येश सर, गायत्री मॅडम, नितीन सर आणि DFF team यांनी घेतलेली मेहनत शब्दात व्यक्त करण्यापलीकडे आहे.

सुरवातीपासून सर्वांचे आदराने केलेलं स्वागत,देहम मधील मन प्रसन्न करणारे नैसर्गिक वातावरण,भाग्येश सरांचे सकाळी शारीरिक व्यायाम, निसर्गातील पंचत्वांशी एकरुपता व जीवन शैली, कृतज्ञता, क्षमाशीलता,संयम, सचोटी, सकारात्मक सातत्य ठेवून शारीरिक व मानसिक त्रासाला दूर ठेवण्यासाठी बहूमुल्य मार्गदर्शन आम्हाला निरोगी राहण्याची गुरूकिल्ली मिळाल्याचं समाधान आहे, शेवटपर्यंत आमचा उत्साह कायम ठेवला.

सरांनी आंतरिक सामर्थ्य शक्तीने आम्हा सगळ्यांना जिंकून घेतले. पालेशा सरांनी विविध ख्यातनाम व्यक्तींच्या आहारशैली व आपल्या निरोगी जीवन शैली करीता आहाराचे महत्व, निवेदिता मॅडम यांनी घेतलेले सुख दु:खाचे कारण,स्वचिंतन, शुभ चिंतन इ.सवयी, डॉ देवयानी यांनी घेतलेले विविध live games व्दारे छोट्या छोट्या गोष्टींतून आनंद मिळवणं, गायत्री मॅडम यांनी घेतलेले मेडीटेशन, सतत कार्यशाळेतील उत्साह, डॉ.नेहा मॅडम यांनी सांगितलेली physical activity, Zumba dance, डॉ हर्षिता यांनी केलेले नाडी परिक्षण,डॉ. शितल यांनी घेतलेली विविध weight gain/loss protocol.सर्वांच्या अनुभवातून आलेले ज्ञान उत्कृष्टरित्या मिळाली.

विविध प्रकारच्या सलाद,सापसीडी compitition मधे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरण अप्रतिम होते, Protocol प्रमाणे विविध प्रकारच्या उत्कृष्ट खाद्य पदार्थांची रेलचेल, सकाळ संध्याकाळ तपासणी पण होत असे. निरोप समारंभामध्ये ही अंतर्मने जिंकली, खाऊ पण मिळाला.सगळं मनाला भाऊन गेलं. माझ्या मधे बदल घडविण्याची संधी मला मिळाली. मला माझे ध्येय गाठता येईल हा आत्मविश्वास वाढलाय.डाॅ.भाग्येश सर व त्यांच्या सहकाऱ्यांचे मनापासून आभार व कृतज्ञता व्यक्त करतो. अशा अप्रतिम अभ्यासाचं आयोजनाने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी डॉ.भाग्येश सर आणि त्यांच्या टीमला भरघोस यश मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.असेच आपले प्रेम वृध्दिंगत होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. या निरोगी जीवनशैली चे ज्ञान स्वतः निरोगी राहुन इतरांना प्रोत्साहित करणे हेच माझे ध्येय असेल.

Rose