By
My Success Story
Posted by
Pushkar Nimbalkar
मी संगीता निंबाळकर. पुष्कर निंबाळकर ची आई. पुष्कर ला सात ऑक्टोबर 2017 साली डायबिटीस डिटेक्ट झाला. तेव्हा तो सात वर्षाचा होता. त्याची तपासणी केली तेव्हा त्याची शुगर 650mg. होती आणि त्याचा इन्सुलिन प्रवास सुरू झाला. डॉक्टरांनी सांगितले की त्याला आता आयुष्यभर इन्सुलिन द्यावी लागेल. हे ऐकून क्षणभर माझ्या पायाखालची जमीन सरकली. अरे देवाने आपल्या सोबत काय केले. एक डॉक्टर झाली दुसरे तिसरे सर्वच झाले. सर्वांनी हेच सांगितले की याला नेहमीसाठी इन्सुलिन द्यावे लागेल. ठीक आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे सकाळी त्याची फास्टिंग शुगर270mg. आणि पोस्ट मिल शुगर490mg. अशी राहायची. त्याला मी दिवसभरात 36 युनिट इन्सुलिन द्यायची. आणि Hba1c-16 एवढी होती. असा प्रवास माझा मार्च 2022 पर्यंत सुरू राहिला.
त्याला काही गोड खायला द्यायचे नाही चॉकलेट द्यायचे नाही. जे वय त्याची खाणे पिण्याचे होते त्यातच त्याला बंधन टाकण्यात आले मला खूप वाईट वाटायचे पण एके दिवशी माझ्या मिस्टरांच्या मित्रांनी कुलकर्णी सरांचा ॲड्रेस दिला त्यानंतर मी त्यांची देवी ना ऐकून त्यांना पाच एप्रिल 2022 ला जॉईन झाले माझा डीएपी प्रवास सुरू झाला एवढे तर डॉक्टर झाले आणखी एक डॉक्टरांचे ओपिनियन घेऊ असे झाले आणि पुष्करच्या डायबिटीज मुक्तीचा प्रवास सुरू झाला.
आम्ही त्यांचे दर महिन्याचे विविध अटेंड करून त्यांनी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण प्रोटोकॉल पाळत आहोत आता पुष्करची दिवसभराची दिनचर्या चेंज झाली सकाळी उठून एक्झरसाइज करणे हॉलीबॉल खेळणे त्यांनी सांगितल्याप्रमाणे ज्यूस घेणे बॉडी डिटॉक्स करणे हा सर्व प्रवास सुरू झाला हे सर्व पाळता पाळता त्याची इन्सुलिन कमी होत गेले आणि माझा विश्वास Dff वर आणखी जडला तेव्हा आम्ही जुलै 2022 चा रेसिडेन्शिअल कॅम्प जॉईन केला त्यात पूर्ण माहितीच मिळाली आता त्याची फास्टिंग शुगर81mg, आणि पोस्टल शुगर154mg. एवढी असते Hba1c-9 आली आहे आता त्याला दिवसभरात आठ युनिट एवढे इन्सुलिन द्यावे लागतात अजूनही कमी होईल अशी माझी खात्री आहे कारण 8 unit वर तो hypo होतो त्याला दिवसभरात 5unit पुरेशी आहे डॉक्टरांचे म्हणणे असे आहे की त्याच्या पॅनक्रिया ऍक्टिव्ह होत आहे आता तर त्याला इन्सुलिन पंप सुद्धा लावायला लावले होते पण त्यांनी ते एका तासात काढून फेकले.
तो म्हणाला मी हे घेऊन जगू शकत नाही कारण त्याकडे बघून मला सारख वाटायचं की मी मधुमेह पेशंट आहे आणि तो मी नाहीच आहे मला खात्री आहे की तो यातून लवकरात लवकर पूर्णपणे बाहेर पडेल याची सर्व श्रेय Bk सर आणि त्यांची डी एफ एफ टीमला जाते आता आम्ही डायबिटीज मुक्त नाही तर डिसीज फ्री फोरेवर झालो आहेत हे मी ठामपणे सांगते🙏🙏🙏